एल-निनोच्या पार्श्वभूमीवर धरणे,जलाशयातील अनधिकृत पाणी उपशावर प्रतिबंध

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर धरणे,जलाशयातील   अनधिकृत पाणी उपशावर प्रतिबंध
Published on

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर धरणे, जलाशयातील
अनधिकृत पाणी उपशावर प्रतिबंध

परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आदेश

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील धरणे, प्रकल्प, जलाशय, नद्या, कालवे व इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा प्रतिबंधित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

राज्यात एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जलसंपदा विभागाने राज्यातील धरणे, जलाशय व इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. परभणी जिल्ह्यातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा उपलब्ध राहावा आणि संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी उपलब्ध पाणीसाठा संरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे, प्रकल्प, जलाशय, नद्या, कालवे व इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यात येणार असून उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करताना पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या काळात जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास जलस्रोतांमधून अनधिकृत अथवा बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा समूहांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com