esakal | पुणेकराला आला विचित्र अनुभव; पार्सल मिळालं एका महिन्यानं तेही कमीच
sakal

बोलून बातमी शोधा

parcel

गहाळ झालेल्या वस्तूंचे पैसे संबंधिताला देण्याचे ग्राहक आयोगाचे आदेश

पुणेकराला आला विचित्र अनुभव; पार्सल मिळालं एका महिन्यानं तेही कमीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कामानिमित्त छत्तीसगड येथे शिफ्ट झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पॅकर्स ऍण्ड मुव्हर्सच्या गैरकारभाला सामोरे जावे लागले आहे. त्याने पाठवलेले नऊपैकी सातच बॉक्‍स त्याचा घरी पोचले. तसेच सहा दिवसांऐवजी ते तब्बल एका महिन्याने डिलिव्हर झाले आहेत.

पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स कंपनीच्या गैरकारभाराबाबत अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केलेल्या इंजिनिअरला दिलासा मिळाला आहे. गहाळ झालेल्या बॉक्‍समध्ये असलेल्या सामानाचे 16 हजार रुपये आणि तक्रारखर्चापोटी दोन हजार रुपये कंपनीने इंजिनिअरला द्यावे, असा आदेश आयोगाने दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी देशमुख आणि अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला.

कसली देशभक्ती? जिथं TRP आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी केला शहीद जवानांचा वापर

या बाबत मोपेद्रकुमार (रा. मुंढवा) यांनी सोबीर सिंग, पॅकर्स व मूव्हर्स, चिखली विरुद्ध आयोगात तक्रार दाखल केली होती. छत्तीसगडमधील धामात्री येथे सामान पोचविण्यासाठी आठ हजार रुपये देण्याचे तक्रारदार आणि कंपनीत ठरले होते. कंपनीने तक्रारदार यांचे साहित्य वेगवेगळ्या नऊ बॉक्‍समध्ये पॅक करून 17 ऑगस्ट 2019 रोजी पुण्यातून पाठवून दिले. साहित्य 4 ते 6 दिवसात धामात्री येथे पोचेल असे, त्यांना सांगण्यात आले होते. मात्र ते थेट एका महिन्यानंतर पोचले. त्यावेळी त्यात दोन बॉक्‍स कमी होते.

गहाळ झालेले बॉक्‍स मिळण्यासाठी तक्रारदार यांनी कंपनीला फोन केला. मात्र त्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित बॉक्‍स किंवा त्याबद्दलचे पैसे मिळण्यासाठी मोपेद्रकुमार यांनी आयोगात तक्रार दाखल केली.

बहिणीशी प्रेमसंबंधाचा राग; पुण्यात 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार, आईलाही मारहाण​

इतरांचेही बॉक्‍स केले गहाळ :
मोपेद्रकुमार यांना त्यांचे बॉक्‍स नागपूर येथील एका ग्राहकाकडे गेले असल्याचे सांगितले. त्यामुळे मोपेद्रकुमार यांनी नागपूर येथील ग्राहकांशी संपर्क केला असता त्याने बॉक्‍स त्यांच्याकडे आले नसल्याचे सांगितले. आमचे देखील सामान गहाळ झाल्याचे त्यांनी तक्रारदार यांना सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)