esakal | विद्यार्थ्यांचे शिक्षण डावलणाऱ्या शाळांविरोधात पालकांचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

विद्यार्थ्यांचे शिक्षण डावलणाऱ्या शाळांविरोधात पालकांचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शुल्क (Fee) न भरलेल्या विद्यार्थ्यांचे (Student) ऑनलाइन शिक्षण (Online Education) थांबविणाऱ्या, विद्यार्थ्यांना थेट दाखले (Living Certificate) देणाऱ्या शाळांच्या विरोधात आणि अशा शाळांवर (School) कारवाई (Crime) करण्याची मागणीसाठी पालकांनी (Parents) विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन (Agitation) करण्यात आले. (Parents agitation against schools that disrupt students education)

सावित्री सन्मान फाउंडेशन आणि माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी एकत्रित येऊ हे आंदोलन केले. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणाऱ्या शाळांविरोधात कारवाई व्हावी, म्हणून वारंवार पत्र व्यवहार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने पालकांनी आंदोलन करण्याचा बडगा उचलला. कोरानाच्या महामारीत अनेक पालक अर्थिक संकटात सापडले असताना शाळा शंभर टक्के शुल्क आकारणीसाठी सक्ती करत आहेत. त्याशिवाय शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबविले जात आहे. त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठीचा संबंधित पासवर्ड दिला जात नाही. काही शाळांनी तर विद्यार्थ्यांना थेट दाखले दिले आहेत. यामुळे संपप्त झालेले ७० हुन अधिक पालक आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा: पुणे शहरात वादळीवारा व पावसामुळे दोन दिवसात 55 झाडे कोसळली

‘शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क असून त्याचे बाजारीकरण सुरू केले आहे’, ‘शाळा नाही, शुल्क नाही’, ‘शुल्क नाही, शाळा नाही, अशी शाळांची भूमिका असेल; तर ‘शाळा नाही, शुल्क नाही’ अशी पालकांची भूमिका असेल’, ‘शाळांवर कारवाई झालीच पाहिजे,’ असे फलक हाती घेऊन पालकांनी आंदोलनादरम्यान निदर्शने केली.

यावेळी टिळेकर, फाउंडेशनच्या संस्थापिका सोनल कोद्रे आणि पालकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क डावलणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उकिरडे यांनी पालकांना यावेळी दिले.

loading image