
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी काही शाळा शासनाची आवश्यक मान्यता नसताना प्रवेश जाहिरात करत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १३ शाळा पूर्णतः अनधिकृत असून, २४ शाळा शासनमान्यता असूनही मूळ जागेवर त्या चालू नाहीत, तर नऊ शाळांकडे केवळ इरादा पत्र असून अंतिम मान्यता नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.