बारावी ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा उडाला बोजवारा; पालकांच्या तक्रारींचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जुलै 2020

अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील तांत्रिक समस्या तक्रार स्वरूपात राज्य मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या.

पुणे : बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खुली झालेल्या या लिंकवरील तांत्रिक त्रुटींमुळे पालकांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसांपासून अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in संकेतस्थळावरुन स्वतः किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

नॅनोटेक्नॉलॉजीद्वारे कोविडची लस शोधणे शक्य; वाचा कुणी केला दावा?​

त्यामुळे गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी शुक्रवारी सकाळपासूनच संबंधित संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरवात केली. मात्र, अर्ज भरताना संकेतस्थळ हॅक होणे, संबंधित पेज खुले न होणे, विहित शुल्क भरताना व्यवहार अपूर्ण राहणे, व्यवहार पुढे न जाणे, अर्जाची प्रक्रिया अपूर्ण राहणे, अशा असंख्य तांत्रिक अडचणी येत होत्या. यामुळे पालक हैराण झाले होते.

अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील तांत्रिक समस्या तक्रार स्वरूपात राज्य मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या. संकेतस्थळावरील तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी मग राज्य मंडळ देखील कामाला लागले आणि दिवस मावळण्यापूर्वी संबंधित संकेतस्थळावरील त्रुटींचा ओघ कमी झाला.

ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!​

दिवसभरात अडीच हजार अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण
"गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा यंदा पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरवातीला अडचणी येत होत्या, मात्र आता त्रुटी दूर झाल्या आहेत. काही पालकांना अर्जासाठीचे शुल्क भरताना ऑनलाइन व्यवहार ठप्प होत होते. त्याही समस्या सोडविण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जवळपास अडीच हजार अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे."
- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents have lodged a complaint against the technical errors in online HSC marks verification process