ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!

Twitter
Twitter

पुणे : सायबर गुन्हेगारांनी जगप्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटर खाते हॅक करुन बिटकॉईनमध्ये केलेल्या गैरव्यवहाराच्या प्रकाराची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. महाराष्ट्रातील नामांकीत व्यक्तींसह सर्व नागरिकांच्या ट्विटर खात्याचे योग्य प्रकारे संरक्षण करण्याच्या सूचना सायबर पोलिसांनी ट्विटरला दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह बिल गेट्स, जेफ बेझोस, एलॉन मस्क अशा अब्जाधीश उद्योगपतींचे ट्विटर खाते बुधवारी (ता.१५) सायबर गुन्हेगारांनी हॅक केले होते. त्याद्वारे सायबर गुन्हेगारांनी फेक ट्वीट पोस्ट केली. "एक हजार डॉलरच्या बदल्यात दोन हजार डॉलर" असे आमिष या ट्वीटवर दाखविण्यात आले. ते ट्वीट खरे समजून अनेकांनी बिटकॉईन चलनाचा व्यवहार केला. त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली.

दरम्यान, महाराष्ट्रासह भारतात ट्विटर वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यावर उद्योगपती, राजकीय नेते, सेलिब्रेटी मोठ्या संख्येने आहेत. त्यातच मुंबईमध्ये ही संख्या मोठी असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ट्विटर हॅकिंगची गांभीर्याने दखल घेतली. 

महाराष्ट्र सायबर हे भारतीय सायबर विश्वातील घडामोडींबाबत जागरुक असल्याचे स्पष्ट करीत सायबर पोलिसांनी "माहिती तंत्रज्ञान कायदा 2000" नुसार तत्काळ ट्विटरला याबाबत सूचित केले. त्यामध्ये ट्विटर वापरकर्ते, त्यांचे ट्विटर प्रोफाईल, डेटा आणि प्रायव्हसीचे योग्य प्रकारे संरक्षण करण्याचे सूचित केले. याबरोबरच अन्य सोशल मीडियाला देखील वापरकर्ते यांच्या सोशल मीडिया खात्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. याबाबत महाराष्ट्र सायबरने ट्विटरवर माहिती दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी घ्या काळजी
- ट्विटर रिक्वेस्ट काळजीपूर्वक स्वीकारा.
- कोणत्याही अनोळखी ट्वीटला प्रतिसाद देऊ नका.
- ट्विटरसह अन्य सोशल मीडियावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
- सोशल मीडियावरील मजकूर खोटा तर नाही ना? याची काळजी घ्या.
- समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर पुढे पाठवू नका.
- आभासी चलनाच्या (गेन बिटकॉइन प्रकार) आमिषाच्या जाळ्यात अडकू नका.
- मजबूत पासवर्ड, सतत पासवर्ड बदलने या स्वरुपाची सायबर सिक्युरिटी वापरा.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com