esakal | पारगाव : झाडांचा वाढदिवस ट्रॅक्टरभर शेण खतापासून बनवलेला केक कापून केला साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

झाडांचा वाढदिवस ट्रॅक्टरभर शेण खतापासून बनवलेला केक कापून केला साजरा

झाडांचा वाढदिवस ट्रॅक्टरभर शेण खतापासून बनवलेला केक कापून केला साजरा

sakal_logo
By
सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : खडकवाडी ता. आंबेगाव येथे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहनिमित्त डॉल्फिन टेकडीवर झाडकरी ग्रुप ने गेल्या अडीच वर्षात केलेल्या वृक्षसंवर्धनाचे काम पाहण्यासाठी आलेल्या वनपरिक्षेत्र आधिकरी स्मिता राजहंस यांनी येथील झाडांचा वाढदिवस एक ट्रॅक्टरभर शेण खतापासून बनवलेला केक कापून अनोख्या पद्धतीने साजरा केला.

वनविभागाच्या वतीने दि. २ ते दि. ८ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या निमित्ताने खडकवाडी येथील डॉल्फिन टेकडीवर झाडकरी ग्रुप ने गेल्या अडीच वर्षात केलेल्या वृक्षसंवर्धनाचे काम पाहण्यासाठी वनपरिक्षेत्र आधिकरी स्मिता राजहंस आल्या होत्या यावेळी वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक साईमाला गित्ते, सोपान अनासुने आणि इतर वनाधिकारी, माजी सरपंच अनील डोके,उपसरपंच एकनाथ सुक्रे, गुलाब वाळुंज, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप आप्पा डोके,नवल पगार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: आर्यन खानला एनसीबीकडून अटक, कोर्टात हजर करणार

येथील माध्यमिक विद्यालयातील शाळेच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली यावेळी झाडकरींच्या झाड जन्म घेतंय या घोषणांचा आवाज सबंध खडकवाडी गावात दुमदुमत होता.

टेकडीवरील झाडांचा वाढदिवस ही संकल्पना झाडकरी कडून राबविण्यात आली. एक टॅक्टर शेण खतापासून बनवलेला केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथनाट्य सादर करून निसर्गसंवर्धनाच्या बाबतीत संदेश दिला.

वनविभागाने वन्यजीवांच्या संरक्षणार्थ ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी झाडकरीचे पंधरा जण उपस्थित होते. सरपंच शीला वाळुंज आणि वनाधिकारी स्मिता राजहंस यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर वनभोजन करण्यात आले.

राजहंस यांनी भविष्यात झाडकरींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांना भविष्यात येथील जीवसृष्टीचा फायदा होईल आणि त्यातून गावातील शेतीला आवश्यक फायदा होईल असे राजहंस म्हणाल्या .

loading image
go to top