

Fog Reduces Visibility; Fatal Collision at Pargaon
Sakal
खुटबाव (पुणे) : पारगाव (ता. दौंड )येथे सकाळी पडलेल्या धुक्यामुळे तसेच पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना छोटा हत्ती वाहन चालवणाऱ्या युवकाचा अंदाज चुकला . यामुळे छोटा हत्ती व समोरून येणारा दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये एकेरीवाडी (ता. दौंड) येथील टुले परिवारातील पत्नी कमल आबासो टुले (वय ४६ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. पती आबासो टुले ( वय ५२ वर्षे ) व चालक मुलगा देविदास टुले (वय २८ वर्षे दोघेही राहणार एकेरीवाडी, तालुका दौंड )हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकेरीवाडी गावावर शोककळा पसरली आहे.