Pune Crime News : पारगाव कारखाना पोलिसांची दबंग कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

पारगाव कारखाना पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुनील मारुती पवार याला बेल्हा जेजुरी महामार्गालगत लोणी गावच्या हद्दीतुन ताब्यात घेतले आहे.
pargaon karkhana police action junnar crime accused arrested
pargaon karkhana police action junnar crime accused arrestedSakal

पारगाव : (ता. आंबेगाव ) येथील पारगाव कारखाना पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुनील मारुती पवार याला बेल्हा जेजुरी महामार्गालगत लोणी गावच्या हद्दीतुन ताब्यात घेतले आहे.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मांजरवाडी येथे काही दिवसापूर्वी चाकूने वार करून पहिलवान कैलास गुलाब पवार यांचा खून करण्यात आला होता. सदर खून नातेवाईक अक्षदा दीपक पवार हिचे लग्नामध्ये फिर्यादी यांचे दाजी कैलास गुलाब पवार व सुनील मारुती पवार हे वरातीमध्ये नाचत असताना दाजींचा पाय सुनील मारुती पवार यांचे पायावर पडल्याने भांडणे झाली होती.

त्याचा राग मनात धरून यातील आरोपी सुनिल पवार याने कैलास गुलाब पवार ( राहणार निमगाव सावा ता. जुन्नर) यांच्या छातीत पाठीत खांद्यावर चाकूने मारून जीवे ठार मारले होते. यातील दोन आरोपीं प्रवीण मारुती पवार व मंगल मारुती पवार या दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली होती. तर मुख्य आरोपी सुनील पवार हा फरारी होता.

सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना खबऱ्यामार्फत सदर आरोपी सुनील मारुती पवार हा लोणी गावचे हद्दीत बेल्हा जेजुरी महामार्गालगत थांबून आहे असे समजले असता त्यानी तात्काळ पोलीस पथक घेऊन घटनास्थळी दाखल होऊन सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सुनील मारुती पवार (रा.केंदूर ता.शिरूर) यास पुढील कारवाई करिता नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ.पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,

उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन पाटील यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे ,पोलीस उप-निरीक्षक भाऊसाहेब लोकरे ,पोलीस हवालदार दत्तात्रय जढर, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे,पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अभंग, होमगार्ड दिपक पारधी व होमगार्ड केंगले यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com