
Airport Protest
Sakal
पारगाव मेमाणे : आपसातील मतभेद, हेवेदावे व चुका विसरून विमानतळाच्या प्रश्नावर पुन्हा एकवार एकजुटीने लढा देण्याचा निर्णय आज वार्षिक सभेमध्ये पारगाव मेमाणे (ता पुरंदर) येथे ग्रामस्थांनी घेतला. गेली आठ वर्षापासून येथे विमानतळ विरोधी लढा सुरू असून या प्रवासात ग्रामस्थ आंदोलनाच्या मुद्द्यावर अलिकडे उदासीन होते. मात्र शासनाच्या नवीन विमानतळ नकाशाप्रमाणे सुमारे शंभर हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. आम्हा बाधितांसाठी गाव काय करणार आहे असा सवाल अक्षय मेमाणे या युवकाने सभेत उपस्थित केला. त्यावेळी चर्चेदरम्यान गावची एकही इंच जमीन व एकही शेतकरी बाधित होणार नाही अशी काळजी घ्यायची, मदत करावयाची असे यावेळी ठरले.