

निरगुडसर, ता. २१ : पारगाव (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेल चोरीच्या दोन व मोटर चोरीची एक, अशा चोरीच्या एकूण तीन घटना घडल्या होत्या. या चोरीतील आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. पारगाव पोलिसांनी पाठपुरावा करून या घटनेतील चोरी गेलेला मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून फिर्यादींना पुन्हा परत केला.
पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागापूर येथे २५ मार्च रोजी पहाटे ३ वाजता रामदास भिकाजी दळे यांच्या राहत्या घरासमोरील ट्रकमधील सुमारे २२ हजार ७५५ रुपये किमतीचे २५० लिटर डिझेल चोरीस गेले होते. तसेच, १ मार्च रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पारगाव येथील ओम हॉस्पिटल समोरून टँकरमधील सुमारे १४ हजार ९५३ रुपये किमतीचे १६०.९५ लिटर डिझेल चोरीस गेले होते. तर, २८ एप्रिल रोजी रात्री नागापूर येथील रवींद्र भिकाजी म्हस्के यांच्या विहिरीच्या कडेला ठेवलेली ६ हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रीक मोटर पंप चोरीस गेला होता.
या गुन्ह्यांतील एकूण २४५ लिटर डिझेल (किंमत २३ हजार ५०४ रुपये) व एक ६ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रीक मोटर पंप, असा एकूण २९ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून तो मुळ मालकांच्या ताब्यात दिला.
सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अमोल वडेकर, अजित मडके, अविनाश कालेकर, देवानंद किर्वे, दत्तात्रेय जढर, पोलिस नाईक शांताराम सांगडे, पोलिस अंमलदार सचिन डामसे, मंगेश अभंग यांनी ही कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.