
खुटबाव : पारगाव ग्रामपंचायत ही दौंड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत समजली जाते. दरम्यान पारगाव, तालुका दौंड येथील जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात समर्थक सरपंच सुभाष बोत्रे यांच्यासोबत तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे.