esakal | पारगाव : वेळप्रसंगी जलसमाधीचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

वेळप्रसंगी जलसमाधीचा इशारा

वेळप्रसंगी जलसमाधीचा इशारा

sakal_logo
By
सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळी गावांची ओळख असणार्या आठ गावातील पाण्याचा प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने पहिले नाहीतर वेळप्रसंगी डिंभे धरणात जलसमाधी घेण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा आठ गावातील नागरिकांनी आज रविवारी लोणी ता. आंबेगाव येथे आयोजित श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितीच्या जनजागृती मेळाव्यात दिला.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, खडकवाडी, वडगावपीर, मांदळेवाडी, रानमळा व थापेवाडी (ता. शिरूर) या गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून हि गावे दुष्काळी गावे म्हणून ओळखली जातात येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलबून आहे वर्षातील चार महिने पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरची वाट पहावी लागते. शेती ओसाड पडत असल्याने येथील महिला दररोज बागायती गावातील दुसर्याच्या शेतावर रोजंदारीवर जात आहे. या गावांमध्ये कोणी आपल्या मुली देत नाहीत त्यामुळे या भागातील अनेक तरूण लग्नाचे वय होऊनही त्यांची लग्न जमत नसल्याच्या समस्या उद्भवल्या आहे.

हेही वाचा: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एनसीबीनं घेतलं ताब्यात

आक्टोबर महिना सुरु होऊनही या गावातील काही भागात अद्याप पाण्याचा टॅकर सुरु आहे कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी हा विषय निवडणुका आल्यावर चर्चेत येतो निवडणुका संपल्या कि पुन्हा मागे पडतो त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी याकरिता शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी पक्षविरहीत श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समिती स्थापन करून आज मेळाव्याचे आयोजन केले होते सुरवातीला लोणी गावातून बैलगाडी व मशालीसह प्रभातफेरी काढण्यात आली यानंतर महादेव मंदिरासमोर मेळावा संपन्न झाला वेदिका करंजखेले, तनिष्का सोनार, दीक्षा वाळुंज, ऋतुजा आदक, गायत्री जाधव या मुलीनी भाषणातून या भागातील व्यथा मांडल्या रविंद्र करंजखेले, संजय पोखरकर, अनिल डोके, उद्धव लंके, वामन जाधव, दिलीप वाळुंज, ऊर्मिला धुमाळ, विठ्ठल ढगे, सोनभाऊ आदक, विशाल तांबे, मयूर सरडे, राजू सिनलकर, विठ्ठल वीर, भीमराव वाघ, सुरेश सुक्रे, संदीप बोऱ्हाडे, सुभाष जाधव, विश्वनाथ साबळे, विजय सिनलकर यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत सागर जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन किरण वाळूंज यांनी केले

पाणीप्रश्नावर वेळप्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही विचार काहींनी मांडला. पाणीप्रश्नावर आक्रमक होताना पक्षाची अडचण येत असेल तर वेळप्रसंगी पक्षाच्या पदांचा त्याग करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या बाळशिराम वाळुंज, भगवान वाघ, गणेश तांबे या पदाधिकार्यांनी यावेळी जाहीर केले.

loading image
go to top