Pargav Youths Chase and Catch Two Interstate Thieves
प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे ) : पारगाव येथील युवकांनी सिनेस्टाईल दोन तासांच्या थरारक पाठलाग करत २ परप्रांतीय चोरट्यांना पकडून यवत पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर चोरटे पारगाव परिसरात घरफोडीसाठी आले होते. हि घटना शुक्रवार दिनांक २१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये यवत पोलिसांनी राहुल मालवी (वय २८ वर्षे, राहणार मध्य प्रदेश), प्रेमचंद चित्रावट (वय ३२ वर्षे, राहणार राजस्थान) यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी दिली.