

Kharadi Traffic
Sakal
खराडी : खराडी-हडपसर रस्त्यावर चौधरी वस्ती ते खराडी सिग्नलदरम्यान ‘बीएनवाय’च्या समोर खासगी वाहनांची बेधुंद पार्किंग सुरू असून, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या अर्ध्याहून अधिक भागावर वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.