
कँटोन्मेंट (पुणे) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन सुरू केले आहे. अनेक मजूर अजूनही शहरात अडकून पडलेले आहेत, तर काहीजण रस्त्यावरच उन्हापावसात आपले जीवन व्यतीत करीत असताना त्यांची उपासमार होऊ लागली आहे, ही समस्या लक्षात घेऊन वानवडी येथील परमार पार्क सोसायटीकडून मोफत शिधा व अन्नदान वाटपाचा उपक्रम मागील तीन महिन्यांपासून हाती घेतला आहे.
वानवडी, कोंढवा, कॅम्प आदी भागातील मजुरांसह सफाई कर्मचारी, कचरावेचक, घरकाम करणाऱ्या महिला, झोपडपट्टीतील गरीब व गरजू व कोरोनाग्रस्त रुग्णांनाही सोसायटीकडून ही अन्नदानाची सेवा दिली जात आहे. आतापर्यंत जवळपास पंचवीस हजार गरजूंनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सोसायटीच्या सुमारे ७०० सभासदांमार्फत निधी गोळा करून ही सेवा पुरविली जात आहे. सोसायटीचे अध्यक्ष नितीन हुगे, फुले - आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद अहिरे, मुस्तफा बोहरी आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.