

Parth Pawar Company Gets Rs 42 Crore Stamp Duty Notice for Pune Land Deal
Esakal
पुणे, ता. ७ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आज मुंढव्यातील ४० एकर जागेचा व्यवहार रद्द करण्याचे जाहीर केल्यानंतर हालचालींना वेग आला. यासंदर्भात अमेडिया कंपनीच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सहजिल्हा निबंधक कार्यालयात येऊन चौकशी केली. दरम्यान, हा व्यवहार कायदेशीर करण्यासाठी जमिनीच्या किमतीच्या सात आणि रद्द करण्यासाठी सात असे एकूण चौदा टक्के मुद्रांक शुल्क (४२ कोटी रुपये) भरावे लागणार आहेत. केवळ तीस हजार रुपये आणि पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कांवर हा व्यवहार रद्द होऊ शकणार नसल्याचे सहजिल्हानिबंधक कार्यालयातून संबंधित कंपनीला नोटिसीद्वारे सांगण्यात आले आहे.