पुण्याच्या शास्त्रज्ञांनी शोधली महाकाय आकाशगंगा; ब्रह्मांडाच्या निर्मितीचे उलगडणार रहस्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

चिली देशातील ऍटाकामा मिलिमीटर ऍरे (आल्मा) या दुर्बिणीच्या साहाय्याने विश्वाच्या निर्मितीनंतर अवघ्या दीडशे कोटी वर्षांत तयार झालेल्या या आकाशगंगेचा शोध घेण्यात आला. आपल्या ब्रह्मांडाचे वयही अंदाजे दीडशे कोटी वर्ष आहे

पुणे : ब्रह्मांडाच्या निर्मीतीवेळी तयार झालेल्या प्रचंड गोलाकार आकाशगंगेचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे. जर्मनी, अमेरिका आणि पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी ही कामगिरी बजावली आहे. यामुळे ब्रह्मांडाच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिली देशातील ऍटाकामा मिलिमीटर ऍरे (आल्मा) या दुर्बिणीच्या साहाय्याने विश्वाच्या निर्मितीनंतर अवघ्या दीडशे कोटी वर्षांत तयार झालेल्या या आकाशगंगेचा शोध घेण्यात आला. "एनसीआरए' मधील प्रा. निस्सीम काणेकर, जर्मनीतील मॅक्‍स प्लॅंक इन्स्टिट्यूटच्या प्रा. मार्कल निलमन, अमेरिकेतील (युएसए) कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. झेवीयर प्रोचास्का आणि प्रा. मार्क रेफेलेस्की या शास्त्रज्ञांच्या चौकडीने हे संशोधन केले आहे. आकाशगंगेचे नामकरण प्रसिद्ध शास्त्रज्ञ ऑर्थर वुल्फ यांच्या नावे "वुल्फ डिस्क' असे केले आहे. "नेचर' या प्रसिद्ध शोधपत्रिकेत हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"वुल्फ डिस्क'चे वैशिष्ट्ये 
- आजपर्यंत आढळलेली सर्वात प्राचीन आणि दुरवरची महाकाय आकाशगंगा 
- स्फोटातून नव्हे तर महाकाय वायूच्या ढगांच्या एकत्र येण्यातून तयार झाली 
- या आकाशगंगेत ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग 10 पटींनी जास्त 

'ते' विद्यार्थी अडकले होते दिल्लीत, पण बार्टीने....

वुल्फ डिस्कच्या शोधाने... 
- ब्रह्मांडाचे वय दीडशे कोटी असतानाही अशा आकाशगंगा अस्तित्वात असल्याचे प्रथमच सिद्ध
- केवळ स्फोटांतून नाही तर वायूच्या एकत्रिकरणातूनही महाकाय आकाशगंगा निर्माण होतात 
- या पूर्वी महाकाय आकाशगंगा या छोट्या मोठ्या आकाशगंगा मिळून तयार झाल्याचे मानण्यात येत होते. आता तो सिद्धांत मोडीस निघाला 
- ब्रह्मांडाचे वय 600 ते 1000 कोटी असताना आकाशगंगा विकसित झाल्याचा सिद्धांत मोडिस. 
- अशा आकाशगंगा कशा तयार झाल्या, याचे गूढ. 

विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

"इतर आकाशगंगांची निर्मिती म्हणजे गजबजच आहे. कारण त्या निर्माण होताना काही स्फोटक घडामोडी घडलेल्या असतात. आपल्या आकाशगंगेप्रमाणे गोलाकार असलेली प्राचीन वुल्फ आकाशगंगा वायूंच्या एकत्र येण्यातून तयार झाली. विशेष म्हणजे इतक्‍या वर्षांपुर्वी अशी आगकाशगंगा कशी तयार झाली याचा शोध आता घ्यावा लागेल.''
- प्रा. निस्सीम काणेकर, खगोलशास्त्रज्ञ, एनसीआरए. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Participation of scientists from Pune to the discovery of a huge spherical galaxy formed during the creation of the universe