पक्ष बदललाय... आता तुम्हीही बदला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

सध्या शनी मागे म्हणून शनीला निघालोय...
गेल्या काही दिवसांपासून मी चर्चेत आहे, अनेक संकटे माझ्यावर येत आहेत. म्हणजेच माझ्या मागे शनी आहे. त्यामुळे मी आता शिक्रापुरातून जळगावला जाण्यापूर्वी शनीला दर्शन घेऊन जाणार, असे सांगत एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांचा निरोप घेतला.

शिक्रापूर  - पक्ष बदललाय; कार्यकर्त्यांनो, तुम्हीही बदला. केवळ राजकारण करण्यापेक्षा आपापले उद्योगधंदेही वाढवा, असा सल्ला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिक्रापूर (ता. शिरूर) येथे कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडसे आपल्या खासगी दौऱ्यानिमित्त जळगावला जाताना रविवारी (ता. १२) शिक्रापुरात थांबले होते. या वेळी शेळके, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ, उद्योजक शेखर दरवडे आदींसह कार्यकर्त्यांबरोबर खडसे यांनी चर्चा केली. 

पुण्यातील ‘खडकवासला’ची वीज कधी होणार चालू वाचा

या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे मानद अध्यक्ष श्रीकांत ढमढेरे, युवा कार्यकर्ते कल्पेश भुजबळ, हनुमंत भुजबळ, माउली नरके, गोपाळ भुजबळ, हृषीकेश फुलावरे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The party has changed Now you also change eknath khadse