पुण्यातील ‘खडकवासला’ची वीज कधी होणार चालू वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

शेतीच्या पाण्याला प्राधान्य
वर्षातील ३६५ दिवसांपैकी साधारणपणे खडकवासला धरणातून कालवा १७० दिवस सुरू असतो. त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार या प्रकल्पातून संपूर्ण वर्षभराऐवजी सहा महिने वीजनिर्मिती करता येणार आहे.

1) सहाशे किलो वॉटच्या दोन जनित्रांद्वारे १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करणार
2) प्रकल्पाचे काम ‘बीओटी’ तत्त्वावर एका कंपनीला
3) धरणातून कालव्यात शेतीसाठी पाणी सोडल्यावर त्याच्या मुखाशीच पॉवर हाउस बांधून जनित्रांद्वारे होणार वीजनिर्मिती

पुणे - खडकवासला धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या मार्च महिन्यापासून धरणातून मुठा उजवा कालव्यात शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प २००६ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पात सहाशे किलो वॅटच्या दोन जनित्रांद्वारे १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम ‘बीओटी’ तत्त्वावर एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने डिसेंबर २०१० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतू कालवा बंद करून खोदाईचे काम करण्यास कंपनीला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मागील काही वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम रखडले होते. खडकवासला धरणातून कालव्यात शेतीसाठी पाणी सोडल्यावर त्याच्या मुखाशीच पॉवर हाउस बांधून जनित्रांद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. वीजनिर्मितीनंतर ते पाणी कालव्यात सोडण्यात येणार आहे. आता वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्‍टरांची रिक्त पदे भरणार 

पानशेत आणि वरसगाव धरणाच्या उभारणीनंतर या ठिकाणी पॉवर हाउस बांधण्यात आले. या दोन्ही धरणांतून खडकवासला धरणात सांडव्यातून पाणी सोडताना विद्युतनिर्मिती केली जाते. त्याच धर्तीवर आता खडकवासला धरणातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When did Khadakwasala get electricity