esakal | खडक वापरून तयार केले 'पर्वती' स्मृतिचिन्ह
sakal

बोलून बातमी शोधा

souvenirs

खडक वापरून तयार केले 'पर्वती' स्मृतिचिन्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - एखाद्या व्यक्तीचा गौरव करायचा असेल तर त्याला देण्यात येत असलेले स्मृतिचिन्ह हे ॲक्रेलिक किंवा लाकडापासून तयार केले जाते. हे दोनच पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र पुण्यातील एका अवलियाने चक्क खडकांपासून ‘पर्वती’ नावाचे स्मृतिचिन्ह तयार केले आहे.

येथील 'प्राइड ऑफ पुणे'चे मानकरी व रॉक आर्टिस्ट जितेंद्र दाते यांनी नुकतेच ‘रॉक सोव्हेनिअर-ऑफ हेरिटेज पर्वती’ नावाचे हे स्मृतीचिन्ह तयार केले आहे. देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातून पुण्यात भ्रमंतीसाठी येणाऱ्यांना स्मृतिचिन्हाच्या स्वरूपात स्वतः सोबत काही तरी घेऊन जाता यावे या अनुषंगाने हे ‘रॉक सोव्हेनिअर’ तयार करण्यात आले आहे.

दाते यांनी आतापर्यंत ५२ हजार २०० वेळा पर्वती भ्रमण केले असून त्यांना गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नामांकन सादर करण्यात आले आहे. त्यामुळे पर्वतीशी त्यांचे खास नाते जुळले आहे. या स्मृतिचिन्हाबाबत दाते यांनी सांगितले की, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून जगातील विविध खडकांचे संग्रह मी करत आहे. पर्वती भ्रमंती करत असताना एक उणीव भासत होती की, अनेक परदेशी नागरिक आपल्या शहरातील पर्वती टेकडीला भेट देण्यासाठी येतात. मात्र येथून परत जाताना येथील कोणती खास आठवण त्यांना बरोबर घेऊन जाता येत नव्हते. ज्यामुळे त्यांच्याकडे या शहराची व पार्वतीची एक आठवण कायम स्वरूपी राहावी या अनुषंगाने स्मृतिचिन्हाची कल्पना सुचली. यातून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर हा भटकी प्राणी-पक्ष्यांच्या उपचारासाठी केला जाईल.’’

हेही वाचा: Corona Update : पुणे जिल्ह्यात दिवसात पावणे सहाशे नवे कोरोना रुग्ण

भारताच्या वेद शिकवण व पौराणिक वस्तूंची वैशिष्ट पूर्ण स्मृतिचिन्ह सहज प्राप्त करण्याच्या हेतूने त्यांनी ‘इंडिक इन्स्पिरेशन्स’ असलेल्या देशातील १४७ कलाकारांना एकत्र करत देशांतर्गत विविध वस्तूंचे स्मृतिचिन्ह तयार करून त्यांचा प्रसार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पर्वती व दख्खन परिसरात सर्वत्र सहज सापडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण खडकांचा वापर करत हे स्मृतिचिन्ह तयार केले असून या स्मृतिचिन्हाला पाहिल्यावर प्रत्येकाला पर्वतीचे व इतर ऐतिहासिक वास्तूंचे स्मरण राहील. असेही दाते यांनी सांगितले.

पर्वती बाबत :

पर्वती येथे असलेल्या खडकाला ‘अमिग्डालॉइडल बेसॉल्ट’ म्हणले जाते. येथील खडकात बदामाच्या आकारात असलेले कॅल्साइट, जिओलाइट्स, ऑलिव्हिन सारखे खनिज या खडकाला अधिक आकर्षित करतात. सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी अल्कधर्मीय ज्वालामुखी वाहून दख्खन पठाराची निर्मिती झाली होती. त्यातूनच सह्याद्री पर्वात रांगांपासून ‘पर्वती’ची निर्मिती झाली.

loading image
go to top