esakal | Corona Update : पुणे जिल्ह्यात दिवसात पावणे सहाशे नवे कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Patient

Corona Update : पुणे जिल्ह्यात दिवसात पावणे सहाशे नवे कोरोना रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.७) दिवसांत ५७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी दिवसभरात ४११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नऊ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १२९ नवे रुग्ण आहेत.

दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत शहरातील रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ७९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३१६, नगरपालिका हद्दीतील ४२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील अकरा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १०७ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ६८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८८, नगरपालिका हद्दीतील ३६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील बारा जणांचा समावेश आहे. दिवसांत पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी तीन, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि नगरपालिका हद्दीतील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

loading image
go to top