पाषाण-सूस पूल खुला करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pashan sus road

बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पाषाण-सूस पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी सेवा रस्त्यांचे काम अपूर्ण आहे.

पाषाण-सूस पूल खुला करा

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पाषाण-सूस पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी सेवा रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण न करता पूल वाहतुकीसाठी खुला केल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी महापालिकेला सांगितले आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांचे काम गतीने पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

पाषाण-सूस पुलाचे काम पूर्ण झाले तरी तो वाहतुकीसाठी खुला केला जात नाही असा आरोप नागरिक करत होते. रविवारी (ता. ४) खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुलाला भेट दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी या पुलाचे उद्‍घाटन केले, त्यावरून गोंधळ झाला. या घटनेनंतर एनएचएआय आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी) संयुक्तपणे पुलाची पाहणी केली. एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.

पाषाण-सूस पूल खुला झाल्यानंतर पाषाणकडून मुंबईकडे जाण्यासाठी येणारा सेवा रस्ता बंद करावा त्याऐवजी पाषाणकडून सूसकडे गेल्यानंतर पूल संपल्यानंतर पुढून यु टर्न घेऊन ही वाहने मुंबईला जावीत. सेवा रस्त्याचे तातडीनं डांबरीकरण करावे. डोंगरावरील पाणी सेवा रस्त्यावर येऊ नये यासाठी पावसाळी गटारांची व्यवस्था करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही यास दुजोरा दिला आहे.

Web Title: Pashan Sus Work Flyover Open Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneFlyover BridgePashan