

Pedestrians Forced to Walk on Main Road Amid Safety Risk
Sakal
पाषाण : पाषाण-सुतारवाडी परिसरातील विघ्नहर्ता चौकात रस्त्यांवर अनधिकृत दुहेरी पार्किंग आणि पदपथांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मुख्य रस्त्यावरून सुतारवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील गृहनिर्माण संस्थांचे रहिवासी आणि महा ई-सेवा केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी पार्किंगसाठी केवळ रस्ताच नाही, तर पदपथही व्यापले आहेत. यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आह. विघ्नहर्ता चौकातील रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर होणारे दुहेरी पार्किंग धोकादायक आहे.