पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Pune Zilla Parishad 
Diamond Jubilee Ceremony
पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण

पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेला येत्या रविवारी (ता.१ मे) ६० वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे येत्या रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हीरकमहोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सर्व माजी अध्यक्षांचा आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचा मागील ६० वर्षांचा मागोवा आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर पवार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या हीरकमहोत्सवी समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता.२९) पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुणे जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ ला झाली आहे.

जिल्हा परिषदेचा हा हीरकमहोत्सवी समारंभ येत्या रविवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील शरदचंद्र सभागृहात होणार आहे. या हीरकमहोत्सवी समारंभाला सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Web Title: Passed Since Establishment Pune Zilla Parishad Organizing Diamond Jubilee Ceremony Presence Ncp President Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top