पुणे - बँकॉकहून विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाकडून सहा कोटी रुपयांचा सहा किलो १४४ ग्रॅम गांजा पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या या प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.