कर्फ्युमध्ये चक्कअँब्यूलन्समधून होतेय प्रवासी वाहतूक

गणेश बोरुडे 
गुरुवार, 26 मार्च 2020


यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दृतगती महामार्गावर सोमवारपासून वाहतुक बंद आहे. तळेगावजवळील (उर्से) टोलनाक्यावर गुरुवारी (ता.२६) सायंकाळी मुंबईहून सांगलीकडे जाणाऱ्या एमएच १० एक्यु ७०६९ या रुग्णवाहिकेबाबत संशय आल्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या महामार्ग पोलिस आणि देहूरोड तळेगाव वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी अडवून तपासणी केली

तळेगाव स्टेशन(पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर पुकारण्यातआलेल्या एकवीस दिवसांच्या संचारबंदीला नानविध क्लुप्ती लढवून हरताळ फासण्याचा प्रकार बेफिकीर नागरिकांमधून चालू आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दृतगती महामार्गावर सोमवारपासून वाहतुक बंद आहे. तळेगावजवळील (उर्से) टोलनाक्यावर गुरुवारी (ता.२६) सायंकाळी मुंबईहून सांगलीकडे जाणाऱ्या एमएच १० एक्यु ७०६९ या रुग्णवाहिकेबाबत संशय आल्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या महामार्ग पोलिस आणि देहूरोड तळेगाव वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी अडवून तपासणी केली.पोलिसांनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडून पाहिले असता आत चक्क निघाले ठणठणीत तब्येतीचे बारा प्रवासी आणि कपडयांच्या मोठया प्रवासी बॅगा. यातील काही प्रवाशांनी आपली जुनी आणि वैदयकीय रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

विशेष म्हणजे या अॅम्ब्युलन्स चालकाकडे ना ड्रायव्हींग लायसन सापडले ना गाडीची कागदपत्रे.तरीही चालक अॅम्ब्युलन्स निळे दिवे लावून वेगात चालला होता.या प्रकाराने पोलिसही अचंबित झाले असून सदर गाडीसह प्रवाशांना पुढील कारवाईसाठी शिरगाव पोलिस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे.

coronavirus: : रिक्षावाले ते रिक्षावालेच; कोरोनाच्या लॉक डाऊनमध्ये लुटालूट

कर्फ्युचे उल्लंघन केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले.वाहतुक शाखेचे अरुण गर्जे,महादेव कवडे,सुधीर साबळे,नारायण सोमवंशी,लवंग पुरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.यापुढे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली धावणार्या वाहनांची देखील कसुन तपासणी करणार असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passengers are travelling through ambulance during curfew

टॉपिकस