Pune News : पथारी व्यावसायिकांकडे ५६ कोटीची थकबाकी

शहरातील ९ हजार ८५२ पथारी व्यावसायिकांची तब्बल ५६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
fund arrear
fund arrearSakal

Pune News : शहरातील ९ हजार ८५२ पथारी व्यावसायिकांची तब्बल ५६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी भरावी अन्यथा परवाना रद्द केला जाईल असा इशारा पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले. त्यानुसार रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या कष्टकऱ्यांना अधिकृतपणे व्यवसाय करण्याचा परवाना दिला गेला. यामध्ये प्रत्येकाचे बायोमॅट्रीक सर्वेक्षण करण्यात आले त्यांना अ, ब, क,ड,इ या या श्रेणीनुसार परवाना देण्यात आले.

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २३ हजार १६६ जणांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १२ हजार ११३ जणांचे शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ५२५ झोनमध्ये पुनर्वसन करण्यात आले. तर उर्वरित परवानाधारक कोठेच व्यवसाय करत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे परवाने रद्द केले आहेत.

महापालिकेने कोरोना काळात पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे स्थायी समितीने या काळातील सुमारे १२ कोटी रुपये शुल्क माफ केले होते.

पण त्यानंतरही अनेक व्यावसायिकांनी नियमीत शुल्क भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात एकूण परवाना धारक आणि पुनर्वसन झालेले १२ हजार ११३ व्यावसायिक आहेत. त्यापैकी ९ हजार ८५२ जणांनी ५६ कोटी१७ लाख ४२ हजार रुपये शुल्क थकविले आहे.

अनेकदा शुल्क भरण्यासाठी आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महापालिकेने आता कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्क न भरल्यास परवाना रद्द केला जाईल, परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नाही, असा इशारा उपायुक्त माधव जगताप यांनी दिला आहे.

५४ कोटी रुपये भरले

एकीकडे ५६ कोटीची थकबाकी असताना दुसरीकडे जानेवारी २०१८ ते मे २०२४ या कालावधीत ५४ कोटी ८७ लाख ५४ हजार रुपयांचे शुल्क महापालिकेकडे व्यावसायिकांनी भरले आहे. त्यामुळे ज्यांनी शुल्क भरले आहे त्यांच्याकडे कोणतीही कारवाई होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com