एफएमवर वाजतेय 'पाठशाला की घंटी'; ट्युन करा विद्यावाणी १०७.४

Pathshala Ki Ghanti Bajao is being broadcast on Vidyavani FM for students who do not have mobiles or laptops
Pathshala Ki Ghanti Bajao is being broadcast on Vidyavani FM for students who do not have mobiles or laptops

पुणे : 'कोरोना'मुळे शाळा बंद आहेत,ऑनलाईन शाळा होत असली तरी अनेकांकडे मोबाईल, लॅपटॉप नाही अशा विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'विद्यावाणी' या एफएम वरून 'पाठशाला की घंटी बजाओ' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. यामध्ये छान छान गोष्टी, गाणी, खेळ आणि गृहपाठ माध्यमातून धडे दिले जात आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात एक नवा प्रयोग होत आहे. 

क्षमतालय आणि आकांक्षा फाऊंडेशन या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांनी रेडिओसाठीचा कार्यक्रम तयार केला आहे. हा कार्यक्रम 'विद्यावाणी'च्या मदतीने प्रसारित केला जात आहे. पुणे विद्यापीठापासून ८ किलोमीटरच्या परिसरातील सर्व रेडिओ फिक्वंन्सीची क्षमता असल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांना 'पाठशाला की घंटी' हा कार्यक्रम ऐकता येणे शक्य आहे. गेल्या दोन आठवड्यापासून पुणे शहराच्या विविध भागातील आकांक्षा फाऊंडेशन चालवत असलेल्या शाळांमधील सिनियर केजी ते इयत्ता पाचवी पर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. 

आकांक्षा फाऊंडेशनच्या इंस्ट्रक्शन स्पेशालिस्ट श्रृती मनेरकर म्हणाल्या, "फाऊंडेशनच्या 'रिमोट कंट्रोल प्रोग्राम'अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट, लॅपटॉप नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. 'विद्यावाणी'वरून २५ मिनीटांचा 'पाठशाला की घंटी बजाओ' कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. तसेच ज्यांना विद्यावाणी वरून ऐकणे शक्य झाले नाही, त्यांना आॅनलाईन ऐकता येणार आहे. मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. "
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे कार्यक्रम 
एका गावात भोला, भुरी, सलमान आणि भिकू हे चार मित्र असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींवर, परिसरातील वातावरण यावर या रोज २५ मिनिटांची गोष्ट सांगितले जाते, त्यातून पर्यावरण, गणित, सामाजिक, वैज्ञानिक गोष्टी शिकवल्या जातात, त्यावर आधारे गाणेही असतात. २५ मिनिटे मुलांना रेडिओ समोर असतात,  हा प्रयोग दिल्ली व राजस्थान येथेही करण्यात आला आहे. 

त्यात प्रमाणे विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जातो. तो पूर्ण करून शाळेच्या व्हॉट्सअॅप गृपवर टाकतात. तसेच काही वेळा ऑडिओ ही करायला सांगितला जातो. एका विद्यार्थ्याचा ऑडिओ दर शुक्रवारी "विद्यावाणी" वरून प्रसारित केला जातो, याचा वेगळा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो."असे सौम्या भास्कराचार्य यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमध्ये वाढल्या जादा विज बिल आकारणीच्या तक्रारी; हे आहे कारण?

ऐकण्याची, कल्पनाशक्ती क्षमता वाढणार
मुले सध्या टीव्ही, मोबाईलच्या स्क्रीनपुढे असतात. पण रेडिओ मुळे मुलांची एेकण्याची क्षमता वाढते. तसेच त्यांना डोळे बंद करून आम्ही जी गोष्ट सांगत आहोत ती इमॅनिजन करायला सांगितले जाते. यातून मुलींची कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते, असे भास्कराचार्य यांनी सांगितले. 

रेडिओवर ट्यून करा
विद्यावाणी १०७.४ एफएम 
वेळ - दुपारी १.३० वाजता
वार - सोमवार ते शुक्रवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com