esakal | धक्कादायक : वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू; रूग्ण ५ तास रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

ambulance.jpg

प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी, कुटुंबियांचा आरोप

धक्कादायक : वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू; रूग्ण ५ तास रस्त्यावर

sakal_logo
By
संतोष आटोळे

शिर्सुफळ (पुणे) : शिर्सुफळ( ता. बारामती) गावातील कोळी वस्तीवरील आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या गजानन कांबळे (वय 40) यांचे रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने उपचारास विलंब झाला. अन् यामध्ये त्यांचे निधन झाले. यास प्रशासनाचा निष्काळजी पणा कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे मृताचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

पुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के कोरोनाबाधित

शिर्सुफळसह परिसरात गजानन आचारी काम करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यांच्यासह त्याची पत्नी व अनुक्रमे 12 व 13 वर्षांची दोन मुले. कसलीही स्थावर मालमत्ता नाही. सोमवारी (ता. 7) अचानक त्याचा घसा बसला व बोलता येईना कदाचित आचारी काम करीत असताना तेलाचा वास व पाण्यात बदल झाल्याने घसा बसला असावा त्यास बोलता ही येईना, दुसरा कोणताही आजार नाही, दारुही बऱ्याच दिवसापूर्वी सोडलेली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. 8) सकाळी सहा वाजताच घरची व स्वतःची आवरा आवर करून उपचारासाठी चालत गावाकडे निघण्यासाठी दोघेही निघाले. वस्ती ते गाव साधारण दोन किलो मीटर अंतर तेवढ्यात गावात जाण्यासाठी एक होतकरु तरुणाने त्यांना आपल्या दुचाकीवरुन गावात सोडले. तेथून त्यांची हेळसांड सुरु झाली. गावातील खासगी डाॅक्टरांनी कोरोना सदृश लक्षणे  अथवा गंभीर परिस्थिती समजून गजाननला साधनसामग्री अभावी तपासण्यास नकार दिला. अन् तत्काळ बारामतीला नेण्यास सांगितले. परंतु कोणाचाही आधार नसल्याने गजानन व पत्नी गावच्या मुख्य रस्त्यावर होते. त्यांना काहीही सुचत नव्हते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लाॅकडाऊन असल्याने तशी लोकांची गर्दी कमीच पण बऱ्यापैकी होती. पण त्यांना बघूनही सर्वजण दुर्लक्ष करीत होते. दरम्यान डाॅक्टरांनी 108 ला फोन लावून अॅम्ब्युलन्स मागविली. परंतु, तिला विलंब होणार असल्याचे समजले. इकडे गजाननाची प्रकृती चिंताजनक होत होती, त्याची पत्नी अॅम्ब्युलन्स येईना म्हणून मदतीसाठी सर्वत्र फिरली तिने अनेक खासगी गाडी वाल्यांना विनवणी केली, पैसेही देण्याचे कबूल करीत होती तरीही कोणीही तयार नव्हते. ती ग्रामपंचायत कार्यालयात गेली परंतु तिथे तिला तिथेही प्रतिसाद मिळाला नाही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऐकूनही घेतले नाही सरते शेवटी गजाननाला रस्त्यातच सोडून त्याची पत्नी सरकारी आरोग्य केंद्रात गेली तेथील कर्मचाऱ्यांच्या हातापाया पडली. परंतु, त्यांनीही कंटाळा केला, गाडी उपलब्ध नाही असे म्हणून वेळ टाळून नेली दुपारचे 12 वाजले पण गाडी ही भेटली नाही आणि उपचारही नाही. अशातच गावातील तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव आटोळे व माजी सरपंच राजमहंमद शेख यांनी ग्रापंचायतमध्ये जाऊन  याबाबत विचारला तेव्हा त्यांनी गावातील आरोग्य केंद्राची अॅम्ब्युलन्स मागवून घेतली आणि दुपारी 1 वाजता अॅम्ब्युलन्सने गजाननला रुई येथे हलविले. दरम्यान गजानन रुई हॉस्पिटलला पोहचला त्याची रीतसर कोरोना अँटिजेंन टेस्ट  झाली ती निगेटिव्ह आली त्यानंतर काही वेळातच त्याने या जगाचा निरोप घेतला. वेळेत उपचार न मिळाल्यानेच त्याचा जीव गेल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याबाबत बोलताना अॅड. राजकिरण शिंदे म्हणाले,  गजाननाच्या पत्नीशी बोलताना तिने हंबरडा फोडून "मला कोणी मदत केली नाही ,कोणी गाडी दिली नाही, ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना कोणी कोणी मदत केली नाही, लय लोक बघून जायची पण कोणीही मदत केली नाही. माझा नवरा 5 तास रस्त्यावर पडून होता. त्याला कोणता आजार नव्हता ..दोन लहान मुले आहेत त्यांच्यासाठी आता मी काय करू ..शेती नाही ..असे म्हणून लवकर गाडी भेटली असती तर माझा नवरा वाचला असता .."असे  हुंदके देत दुःख व्यक्त करीत व्यथा सांगत होती...!  बारामती तालुक्यात रुग्णवाहिके अभावी जीव जाणे हे दुर्दैवी आहे.