
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांचा निषेधासाठी पुण्यात पतित पावन संघटनेने आंदोलन केले पण या आंदोलनादरम्यानम मोठी चूक झाली.आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घातला आणि फोटोही जाळला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची आता शहरात चर्चा रंगली आहे. मात्र संघटनेकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.