पोलिसांशी चकमकीत तीन गुन्हेगार ठार

पोलिसांशी चकमकीत
तीन गुन्हेगार ठार
Published on: 

पाटणा, ता. ६ (पीटीआय) : बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मनेर येथे शुक्रवारी सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन गुन्हेगार ठार झाले. जयप्रकाश यादव, राजा कुमार आणि बबलू यादव अशी मृतांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद होती. गेल्या महिन्यात प्राथमिक कृषी पतसंस्थेचे अध्यक्ष संजीत कुमार यांच्या हत्येप्रकरणी या तिघांना आरोपी करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आणि खासदार मीसा भारती यांनी ही चकमक बनावट असल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष कृती दल (एसटीएफ) आणि जिल्हा पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच गुन्हेगारांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तिघे जखमी झाले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारांनी पोलिसांवर २४ हून अधिक गोळ्या झाडल्या, तर पोलिसांनी १८ गोळ्या झाडल्या. चकमकीत जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी दानापूर उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


हत्या केल्याचा आरोप
मृतांच्या नातेवाइकांनी या तिघांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाच्या आवारात पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांना लाठीमार करावा लागला. यावेळी रुग्णालयाच्या आवारात तोडफोडही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.