त्यांना करायचा होता "मुळशी पॅटर्न', पण पोलिसांनी असा शिकवला धडा
पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यात जमीन व्यवहार व गुन्हेगारी वर्चस्वासाठी दहशत माजविणाऱ्या वेगवेगळ्या दोन टोळ्यांतील 18 आरोपींवर पौड पोलिसांनी "मोका'ची कारवाई केली.
याबाबत पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांनी माहिती दिली की, जमीन व्यवहार व गुन्हेगारी वर्चस्वासाठी मुळशी तालुक्यात रिहे खोऱ्यात दहशत माजविणाऱ्या आकाश बाळू पडळघरे, स्वप्नील काळुराम पडळघरे, अक्षय रोहिदास पडळघरे, नवनाथ बाळू भोईने, समीर अशोक शिंदे, श्रीकांत लक्ष्मण पडळघरे, दत्ता किसन शिंदे, विकास बाळू मालपोटे, ज्ञानेश्वर ऊर्फ माउली एकनाथ पडळघरे आदी नऊ जणांवर ही कारवाई केली. या टोळीतील आरोपींनी जानेवारीमध्ये रिहे येथील पडळघरवाडी फाट्याजवळ फिर्यादी विशाल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या फॉर्च्युनर मोटारीला पिकअप गाडी आडवी घालून ट्रॅक्टरने धडक दिली. तसेच, मंगेश पालवे याच्यावर वार केले होते.
तसेच, दुसऱ्या टोळीतील प्रमुख शुभम संभाजी गोळे, नीतेश रामेश्वर भारती, विजय मानसिंग ठाकूर, संकेत युवराज सोनवणे, हर्षद गोळे, हरिदास शेडगे व इतर तिघेजण आदी नऊ जणांवरही "मोका'ची कारवाई केली आहे. या आरोपींनी मार्च महिन्यात पिरंगुटमधील कोका कोला कंपनीसमोरून तीन व्यक्तींना लवळे येथे नेऊन त्यांच्याजवळील पंधरा हजार रुपये व मोबाईल घेतले होते. याबाबत ट्रकचालक शंकर लवटे यांनी फिर्याद दिली होती.
पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, उपनिरीक्षक अनिल लवटे, अब्दुल शेख, शंकर नवले, संजय सुपे, सागर नामदास, श्रीधर जगदाळे, जय पवार, मयूर निंबाळकर, अक्षय नलावडे, शेखर हगवणे, सुनील कदम, गणेश साळुंखे, सुरेश कांबळे, तृप्ती भंडलकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.