
वाघोली : मांजरी खुर्द येथे पाव विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कोयत्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर दुचाकी सोडून हल्लेखोरांनी पळ काढला. ही घटना जिल्हा परिषद शाळेच्या मागे घडली. या हल्यात विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसीम अब्बासी बसीर (वय ६०, रा. हडपसर) असे जखमी झालेल्या पाव विक्रेत्याचे नाव आहे.