Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

टेकड्यांवर टाक्या उभारण्याचा पुणे महापालिकेचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय हरित लवादाकडून मिळाला हिरवा कंदील

पुणे : शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पंचवटी, विधी महाविद्यालय आणि फर्ग्युसन टेकडीवरील वनविभागाच्या जमिनीवर पाण्याच्या टाक्या उभारण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महापालिकेला हिरवा कंदील दिला आहे. एनजीटीचे न्यायमूर्ती एम. सत्यनारायण आणि विशेष सदस्य डॉ. अरुण कुमार वर्मा यांनी हा निकाल दिला.

पुणेकरांना समान पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिकेकडून शहरात ८२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहे. सुमारे २५० कोटींचा प्रकल्प असलेल्या या योजनेमुळे २०४७ पर्यंत पुण्याच्या पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येणार होता. ८२ पैकी तीन टाक्या या शहरातील पंचवटी, विधी महाविद्यालय व फर्ग्युसन टेकडीवर उभारण्यात येणार होत्या. त्याचे काम लार्सेन अ‍ॅण्ड टर्बो कन्स्ट्रक्शन (एल अ‍ॅण्ड टी) कंपनीकडून सुरू केले. मात्र, टाक्यांच्या बांधकामाविरोधात डेक्कन जिमखाना परिसर समितीच्यावतीने डॉ. सुषमा दाते यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली. यामध्ये हा प्रकल्प पर्यावरणास नुकसानकारक असल्याचे त्यात नमूद केले होते. त्यामुळे २०१९ पासून या प्रकल्पावर स्थगिती आणण्यात आली होती. या प्रकरणात, पुणे महानगरपालिकेच्या वतीने अ‍ॅड. राहुल गर्ग यांनी बाजू मांडली.


पुणेकरांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. विधी महाविद्यालय टेकडीवरील जागा विकास आराखड्यानुसार पाणीपुरवठ्याच्या टाकीसाठी आरक्षित आहे. पाषाण येथील पंचवटी टेकडीसाठी लागणारी जागा हे खुले मैदान असून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या टेकडीवरील लागणाऱ्या जागेसाठी वृक्ष विभागाकडून परवानगी घेण्यात आली आहे. तसेच एल अ‍ॅण्ड टी कंपनीने यापूर्वीच ५० हजार झाडे लावले आहेत. पंचवटी टेकडी व विधी महाविद्यालय टेकडीवरील बांधकामासाठी भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान विभागाची परवानगी घेण्यात आली असल्याचे ॲड. गर्ग यांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले.

शहराच्या वाढती लोकसंख्या व अपुरी जागा यांचा विचार करता या शहराला या पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेत टाक्या उभाराव्यात, असे निकालात नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com