पवना धरणात गतवर्षीपेक्षा 14 टक्के कमी पाणीसाठा

संदीप घिसे
सोमवार, 15 जुलै 2019

गेल्या 24 तासात 33 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून धरणातील पाणीसाठ्यात 28.72 टक्के इतकी वाढ झाली आहे.

पिंपरी : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. उशिराने आलेल्या पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पवना धरणात गतवर्षीपेक्षा 14 टक्के पाणीसाठा कमी आहे.

पवना धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने पाणीकपात रद्द करून नियमित पाणीपुरवठा करा, अशी मागणी राजकीय नेते आणि शहरातील नागरिकांकडून होत आहे. मात्र यंदा पावसाचे आगमन उशिराने झाल्याने धरणातील पाणीसाठा अवघा 13 टक्क्यांवर आला होता. गेल्या 24 तासात 33 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून धरणातील पाणीसाठ्यात 28.72 टक्के इतकी वाढ झाली आहे.

यंदा 29 जून रोजी खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली आतापर्यंत पवना धरण परिसरामध्ये 1075 मिलिमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी आजच्याच तारखेला धरण परिसरात 1402 इतका पाऊस नोंदला गेला होता. सध्या धरणात 42.18 टक्के  इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला 56.38 टक्के पाणीसाठा होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawana dam has 14 percent less water storage than last year