Pune : ९३३ कोटी भरा, नाहीतर पुण्याचं पाणी बंद करू; जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा

Pune Water Dispute : जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण वापराच्या ८.८४ टीएमसी अतिरिक्त पाणीवापर केला आहे. अतिरिक्त पाणीवापर केल्यास दंड आकारला जातो.
Water Dispute Escalates Between Department and Pune

Water Dispute Escalates Between Department and Pune

Esakal

Updated on

पुणे शहरासाठी जलसंपदा विभागाने ११.६० टीएमसी पाणीकोटा मंजूर केला आहे. करारानुसार हा कोटा येत्या १५ दिवसांत संपणार आहे. महापालिकेने तातडीने ९३३ कोटी रुपयांची थकबाकी भरावी, अन्यथा करारानुसार पाणी कोटा संपत असल्यामुळे पुरवठा तत्काळ खंडित करावा लागेल, असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. त्यामुळे महापालिका यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com