
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असल्यामुळे आपत्कालीन सेवा वेळेवर पोहोचणे आणि प्रत्येक प्रभागात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका अग्निशमन विभागाने शहरातील विविध भागांमध्ये नव्या अग्निशमन केंद्रांची उभारणीचे नियोजन केले आहे. काही केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात असून, काहींसाठी जागा निश्चिती व निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.