
PCMC Projects
Sakal
भोसरी : आळंदी रस्त्यावरील कै. श्री ज्ञानेश्वर (माउलीदादा) सोपानराव गवळी वाहनतळाचे हस्तांतर महापालिकेच्या स्थापत्य विभागाद्वारे भूमी जिंदगी विभागाकडे गुरुवारी (ता. ११) करण्यात आले. त्यामुळे उद्घाटन होऊनही सुरू होण्यास दिरंगाई झालेले हे वाहनतळ सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. हे वाहनतळ सुरू झाल्यावर भोसरीतील आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यास मदत होणार आहे.