महिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन

युनूस तांबोळी
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

टाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले तर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. अशी खैरेनगर (ता. शिरूर) येथील महिलांनी समस्या मांडल्या. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी पिशव्यांना वाढलेली मागणी लक्षात घेत जिल्हा बँकेने महिलांना प्रशिक्षणाचे आयोजन केले.

खैरेनगर (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत स्वयंसहायता बचत गटातील महिलांना व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण तिन दिवसाचे सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालीका डॅा. वर्षा शिवले, विभागीय अधिकारी आर. एन. टेमगिरे, विस्तार अधिकारी डी. के. गायकवाड, ग्रामसेवक अजीत पलांडे, रमेश बांडे, तेजश्री देशमुख, माजी सरपंच एकनाथ खैरे, प्रशिक्षक अरूणा जाधव. बैकेचे व्यवस्थापक डी. वाय. पचंगे आदी बचत गटातील महिला उपस्थीत होत्या.

शिवले म्हणाल्या, दुष्काळी परीस्थीतीवर मात करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्याला जो व्यवसाय आवडेल त्यांनी त्याचे प्रशिक्षण घेऊन बाजारपेठ मिळवावी. यासाठी जिल्हा बॅंकेमार्फत महिलांना कर्जपूरवठा करण्यास मदत करणार आहोत.

जाधव म्हणाल्या, बचत गट व भिमथडी जत्रेच्या माध्यमातून पिशव्यांचा व्यवसाय मोठा केला आहे. जिद्द व चिकाटी ठेवून कोणताही व्यवसाय केल्यास निश्चित यश मिळते. त्यामुळेच व्यवसायाबरोबर या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली.

बँकेमार्फत शिलाई मशीन....
शिरूर तालुक्यातील खैरेनगर हे नेहमीच दु्ष्काळी भाग समजला जातो. या वर्षी देखील भयान दुष्काळाला सामोरे जात असताना रोजगाराची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमा दरम्यान 40 महिलांनी कर्जाऊ शिलाई मशीन घेण्याचे घोषीत केले. त्यावर जिल्हा बँकेकडून या तातडीने कर्जाऊ शिलाई मशीन उपलब्ध करून देणार. यासाठी बचत गटांनी पूढाकार घेण्याचे आवाहन संचालिका डॅा. वर्षा शिवले यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pdcc bank Organizing training of cloth bags for women