Pune News : जिल्हा बँकेची उलाढाल २८ हजार कोटींच्या घरात; देशातील एकमेव जिल्हा बँक

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (पीडीसीसी) आर्थिक उलाढालीत गेल्या वर्षभरात आणखी ४ हजार २९८ कोटी ५५ लाख रुपायांची भर पडली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (पीडीसीसी) आर्थिक उलाढालीत गेल्या वर्षभरात आणखी ४ हजार २९८ कोटी ५५ लाख रुपायांची भर पडली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (पीडीसीसी) आर्थिक उलाढालीत गेल्या वर्षभरात आणखी ४ हजार २९८ कोटी ५५ लाख रुपायांची भर पडली आहे.Sakal

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (पीडीसीसी) आर्थिक उलाढालीत गेल्या वर्षभरात आणखी ४ हजार २९८ कोटी ५५ लाख रुपायांची भर पडली आहे. यामुळे पुणे जिल्हा बॅँकेची व्यावसायिक उलाढाल आता एकूण २८ हजार ५० कोटी ५५ लाख रुपये इतकी झाली आहे.

व्यावसायिक उलाढालीचा २५ हजार कोटींचा टप्पा पार करणारी पुणे ही देशातील एकमेव जिल्हा बँक ठरली आहे. यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता देशात अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकांमध्ये असणाऱ्या शेड्यूल्ड सहकारी बँकांच्या तुलनेतही अग्रगण्य स्थान पटकावले असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी गुरुवारी (ता.२) सांगितले.

जिल्हा बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ठेवी, कर्ज, व्यावसायिक उलाढाल, वसुली, स्वनिधी,नफा, नेटवर्थ, कर्जे, अनुत्पादक(एनपीए) कर्ज वसुली आदी सर्वच बाबींमध्ये आघाडी घेतली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेची आर्थिक उलाढाल सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण २३ हजार ७५२ कोटी रुपायांची होती. त्यात आता सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४ हजार २९८ कोटी ५५ लाख रुपयांची भर पडली आहे. यामुळे केवळ एका आर्थिक वर्षात एकूण व्यावसायिक उलाढालीत २२.१० टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. याशिवाय बँकेस ४१८ कोटी ३२ लाख रुपयांचा ढोबळ आणि ७२ कोटी ७३ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

जिल्हा बँकेची आर्थिक उलाढाल दृष्टीक्षेपात

- एकूण वसूल भाग भांडवल --- ४०८.६४ कोटी रुपये

- बँकेचा एकूण स्वनिधी --- २८४७.९९ कोटी रुपये

- बँकेच्या एकूण ठेवी --- १२ हजार ९६६.२२ कोटी रुपये

- एकूण कर्ज वाटप --- १०,७८५.९९ कोटी रुपये

- बँकेचे खेळते भांडवल --- २०,६१४.५२ कोटी रुपये

- सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांत बँकेने केलेले पीककर्ज वाटप --- २८४३.५८ कोटी रुपये

- बँकेने वसूल केलेले अनुत्पादक कर्ज --- ९४ कोटी रुपये

जिल्ह्यातील शेतकरी सभासद व बँकेचे खातेदार यांना गेल्या १०६ वर्षांपासून बँक अखंडपणे सेवा पुरवत आहे. बँकेचे ठेवीदार, कर्जदार शेतकरी सभासद, अन्य कर्जदार संस्था व हितचिंतकांनी बँकेवर दाखवलेला विश्वास व सदिच्छांमुळेच हे उत्तुंग यश मिळाले आहे.

- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बँक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com