esakal | ...म्हणून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

baramati bajar samiti.jpg

बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाल्याने समितीत आज असा शुकशुकाट होता.

...म्हणून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : केंद्र सरकारने 5 जून रोजी कृषी उत्पादनांवरील सेस व नियमनमुक्ती बाबत लागू केलेला अध्यादेश महाराष्ट्र सरकारने 10 ऑगस्ट रोजी राज्यात लागू केलेला आहे. या परिस्थितीत मार्केट यार्डच्या आवारात व्यापार करणारे व्यापारी, मार्केटच्या बाहेर व्यापार करणाऱ्या लोकांबरोबर स्पर्धा करू शकणार नाहीत. या बाबतीत मार्केट मधील व्यापारी संघटनेने सरकार कड़े मार्केटच्या आवारात सुद्धा सेसची बंदी व एपीएमसी कायदयात बदल करण्यासाठी मागणी केलेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे या मागणी कड़े लक्ष वेधण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांनी आज एक दिवसाचा बंद पुकारला होता. बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाल्याने समितीत आज असा शुकशुकाट होता. शासनाने व्यापा-यांच्या या मागणीची दखल घ्यावी अशी मागणी दि मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर व मिलिंद सालपे यांनी केली आहे. 
 

loading image
go to top