
Pedestrian Safety at Risk: Neglect in Bridge Maintenance
Sakal
पुणे : शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महापालिकेने अनेक रस्त्यांवर पादचारी उड्डाण पूल उभे केले असले, तरी त्यांची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी गत झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून लिफ्टसह पादचारी मार्ग उभारले असले, तरी नागरिकांकडून त्याचा अत्यल्प वापर केला जात आहे. पादचाऱ्यांना सहज व वळसा न घालता रस्ता ओलांडता यावा, अशी व्यवस्था हवी. त्यादृष्टीने महापालिकेने धोरण बदलण्याची गरज आहे. राजकीय दबावात येऊन कुठेही पादचारी मार्ग उभारणे बंद करायला हवे.