
काळेपडळ रेल्वेगेटवर पादचारी उड्डाण पूल उभारावा
उंड्री : काळेपडळ रेल्वेगेट क्र.८च्या बंद केल्याने शाळकरी मुले, भाजीपाला खरेदी करण्यासाठी महिला-ज्येष्ठ नागरिक धोकादायक पद्धतीने ये-जा करीत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पादचारी उड्डाण पूल उभारावा. रेल्वेगेटपासून दोन्ही बाजूला असलेल्या भुयारी मार्गावर विद्युत दिवे वारंवार बंद असल्याने लुटमारीचे प्रकार होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काळेपडळ रेल्वेगेट क्रं८च्या पलीकडे राहणाऱ्या छाया दांगट, बबन जाधव, सुनीता रायकर, भाग्यश्री जामगे, छाया सूर्यवंशी, अर्चना दरेकर, तानाजी दरेकर म्हणाले की, रेल्वेगेट बंद केल्यामुळे दीड किमी अंतर असल्यामुळे महिला, कामगार, कष्टकरी, शाळकरी विद्यार्थी रेल्वेगेटमधूनच जीव धोक्यात घालून ये-जा करीत आहेत. त्यामुळे पालिका आणि रेल्वे प्रशासनाने पादचारी मार्ग उभारून पादचाऱ्यांची गैरसोय दूर करावी, असे त्यांनी सांगितले.
बळवंत पाटील, राघू कदम, गुलाब सय्यद शफीक शेख म्हणाले की, रेल्वेगेटपासून दोन्ही बाजूला दीड किमी अंतरावरून भुयारी मार्ग आहे. वाहनचालक भुयारी मार्गाचा वापर करतात. मात्र, पादचारी दीड किमी अंतरावरून ये-जा करण्याऐवजी जवळचा मार्ग म्हणून रेल्वेगेटमधूनच धोकादायक पद्धतीने ये-जा करीत असतात. पालिका व रेल्वे प्रशासनाने पादचारी मार्ग उभारावा. तसेच भुयारी मार्गापर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत दिवे रात्रीच्या वेळी सुरू ठेवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, काळेपडळ रेल्वेगेट क्र.८च्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे.
कचरा कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, अनारोग्याचा धोका वाढला आहे. कचरा टाकणाऱ्यावर प्रशासनाने कचरा स्वच्छ करून औषध फवारणी करून स्वच्छता करावी, तसेच कचरा टाकणाऱ्यावर कडक कारवाई करावी.
संदीपान कापरे, काळेपडळ
दरम्यान, महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे गेट क्र.८वर फूट ओव्हर ब्रीजचे नियोजन नाही. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने भुयारी मार्गाचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
Web Title: Pedestrian Flyover Should Be Constructed At Kalepadal Railway Gate Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..