
Vadgaon Sheri Traffic
Sakal
वडगाव शेरी : नगर रस्ता ओलांडण्यासाठी विमाननगर चौक आणि चंदननगर परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पादचारी भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असले, तरीही अनेक नागरिक त्याचा वापर न करता थेट वाहतुकीच्या रस्त्यावरूनच ये-जा करत आहेत. भरधाव वाहतुकीतून अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.