पीरसाहेब यात्रा महोत्सव आजपासून सुरु

पीरसाहेब यात्रा महोत्सव आजपासून सुरु

Published on

PTK26B01039
पिराची कुरोली (ता. पंढरपूर) : येथील ऐतिहासिक पीरसाहेब दर्गा.
...........
पिराची कुरोलीत आजपासून पीरसाहेब यात्रा महोत्सव
.......
पटवर्धन कुरोली, ता. ६ : पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत पीरसाहेब यात्रा महोत्सव उद्या शनिवारपासून (ता. ७) सुरू होत असून, यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि पीरसाहेब देवस्थान समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, दर्गा परिसर तसेच गावातील काटेरी वृक्ष काढून टाकण्यात आले आहेत.दर्गा परिसरात विजेची सोय करण्यात आली आहे. ठिकठिकाणी विजेचे दिवे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी दर्गा परिसरात असणाऱ्या हौदाची स्वच्छता केली आहे. यात्रा नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक पार पडली. त्यामध्ये तीन दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (ता. ८) रात्री नऊ वाजता सनई सुरांच्या तालात वाजत गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांसह आलेले हिंदू-मुस्लिम भाविकांकडून पीरसाहेबांना शेरणी वाहण्यात येईल. रात्री मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. ९) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत निकाली कुस्त्या नेमल्या जातील. या कुस्त्या दुपारी तीन वाजता सुरू होतील. यात्राकाळात भाविकांची ये-जा करण्याची सोय व्हावी, यासाठी जादा एसटीची मागणी पंढरपूर व अकलूज आगारातून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com