पुणे : नाल्यात कचरा टाकण्याऱ्यांवर आता होणार फौजदारी कारवाई!

Nala_garbage
Nala_garbage

हडपसर (पुणे) : नालेसफाईसाठी पालिका दरवर्षी कोट्यावधी रूपये खर्च करत असताना काही बेजबाबदार रहिवासी पुनःपुन्हा नाल्यात कचरा टाकत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. अशा ठिकाणी महापालिका प्रशासनाने नजर ठेवावी आणि वांरवार सांगूनही पुन्हा कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांवर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून हडपसर आणि वानवडी येथील नाल्यांची सफाई करण्याची कामे करण्यात आली आहेत. अजूनही बहुतांश नाल्यांची सफाई करणे बाकी असल्याचे चित्र आहे. महापौर आणि पालिका आयुक्तांनी येथील नाल्यांची पाहणी केली. मात्र, अद्याप नालेसफाईची कामे खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली नाहीत. दुर्दैवाची बाब म्हणजे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे घटक आपली जबाबदारी विसरून दुसऱ्यावर जबाबदारी ढकलतात. आपण नागरिकही या नात्याने आपली नैतिक जबाबदारी विसरून गटारात, नाल्यात प्लास्टिक पिशव्या अगदी बिनधास्तपणे फेकत असतो. याच पिशव्या गटारात, नाल्यात अडकून पाणी तुंबते आणि ते रस्त्यावर येते आणि त्यानंतर ते घरात शिरते. आपले शहर स्वच्छ ठेवण्याच्या आपल्या जबाबदारीला हरताळ फासून ती महापालिकेवर ढकलून मोकळे होतो. महापालिकेने आणि लोकांनीही आपापल्या जबाबदार्‍या ओळखून प्लास्टिकच्या पिशव्या गटारात, नाल्यात फेकू नये, असे केल्यास काही दिवसातच आपल्याला फरक दिसून येईल.

नागरिक दिंगबर राणे म्हणाले, घटननेने प्रत्येक नागरिकाला जसे अधिकार दिले आहेत, तसेच काही कर्तव्यसुद्धा दिली आहेत. बऱ्याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे. तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा नागरिकांना विसर पडतो. परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपलीच जबाबदारी आहे, पण त्या जबाबबदारीला केराची टोपली दाखवली जाते.

वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त युनूस पठाण म्हणाले, महापालिका दरवर्षी नालेसफाई करते, मात्र पुन्हा बेजबाबदार नागरिक विविध प्रकारचा कचरा सार्वजनिक ठिकाणी तसेच नाल्यात टाकतात. सार्वजनिक ठिकाणी आणि नाल्यात जे कचरा टाकतील, त्यांच्यावर दंडात्मक अथवा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल. चालू वर्षापासून क्षेत्रीय कार्यलयाऐवजी मुख्य खात्याकडून नाल्याची सफाई करण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com