'या' कारणामुळे लोक वळतायेत भाजी विक्री व्यवसायाकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने काहींच्या नोकऱ्या गेल्या तर हातावरचं पोट असणाऱ्या या घरकाम करणाऱ्या महिलांचे काम बंद झाले आहे. अशा वेळी काही लोकांनी घरातील अर्थिक खर्च भागवण्यासाठी सध्या तेजीत असलेला भाजी विक्री व्यवसाय सुरु करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे.

रामवाडी( पुणे): लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसाय ठप्प  झाले तर काहींच्या नोकऱ्या गेल्या अशा कठीण प्रसंगी हाताश न होता नविन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढला आहे. कोरोनाच्या संकटाने आलेले हे दिवस निघुन जातील पण लोकांनी खचुन जायचं नाही लढायचं आणि जगायचं हे प्रत्येकानी ठरवलं पाहिजे असे आरिफ फाजुल यांनी आपले मत व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चंदननगर, गणेशनगर सोमनाथनगर, खराडी तसेच काही सोसायटयामध्ये  नविन  भाजी विक्रेत्यांनी आपला भाजी व्यवसाय सुरु केला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने काहींच्या नोकऱ्या गेल्या तर हातावरचं पोट असणाऱ्या या घरकाम करणाऱ्या महिलांचे काम बंद झाले आहे. अशा वेळी काही लोकांनी घरातील अर्थिक खर्च भागवण्यासाठी सध्या तेजीत असलेला भाजी विक्री व्यवसाय सुरु करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे. लवकरच  कोरोना आपल्या देशातुन हद्दपार होईल पुन्हा चांगले दिवस येतील सध्या या आशेवर हे लोकं जीवन जगत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'मी एका मॉलमध्ये सेल्स विभागात कामा होतो. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. घरात पाच माणसांची जबाबदारी माझ्यावर असल्याने मी एक महिन्यापासुन भाजी विक्रीचा व्यवसाय करून मिळालेल्या पैशातुन सर्वांच्या गरजा भागवत आहे.''
- आरिफ फाजुल, नविन भाजी विक्रेता

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''सोसायटयामध्ये घरकाम करते. पण, कोरोनामुळे सोसायटयाच्या आत प्रवेश बंद केल्याने भाजी विक्री सुरु करून तात्पुरती का? होईना पोटपाण्याची सोय झाली आहे. 
- सुमन थोरात, नविन भाजी विक्रेत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People are moving towards vegetable selling business due to closure of jobs and businesses