मृतदेह नेण्यासाठी नागरिकांनी काढले पत्रे; जयभवानी नगरमधील घटना!

Pune-Seal
Pune-Seal

कोथरूड (पुणे) : जयभवानी नगर येथील 80 वर्षीय महिला गीताबाई विठ्ठल दहिभाते यांचे संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास निधन झाले. मात्र, शुक्रवारी (ता.५) जयभवानी नगर येथील सर्व रस्ते पत्रे ठोकून, वेल्डिंग मारून बंद केल्याने मृतदेह न्यायचा कसा असा प्रश्न नातेवाईकांना पडला होता.  

स्थानिक रहिवाशी हरीभाऊ सणस यांनी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांना घटनेची कल्पना दिली. तेव्हा कदम यांनी मृतदेह हलविण्यासाठी तात्पुरता रस्ता मोकळा करून देतो असे सांगितले.  

सणस म्हणाले की, 'या आजी येथील शाळेत क्वारंटाईन होत्या. आज संध्याकाळी सर्व शाळा रिकामी करण्यात आली म्हणून आजी चालत घरी आल्या. त्यानंतर तासाभरात आजींचे निधन झाले. त्यामुळे पुढे काय करायचे असा प्रश्न आमच्या पुढे आहे. लोकांची पर्यायी व्यवस्था न करता, कोणतीही कल्पना न देता वस्ती बंद केली आहे.' 

दरम्यान आजी क्वारंटाईन असल्या तरी त्यांचा तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह नव्हता, असे महापालिकेच्या एका कामगाराने सांगितले. मृतदेह बाहेर नेण्यासाठी नागरिकांनी पत्रे काढले. लोकांना बाहेर जाता येईल इतपत रस्ता असावा, अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com