पुणे : लॉकडाऊन काळात घरपोच गॅस सिलिंडर पुरविणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचे होतंय कौतुक

पुणे : लॉकडाऊन काळात घरपोच गॅस सिलिंडर पुरविणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचे होतंय कौतुक

बालेवाडी : बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण या भागातील सर्वच गॅस एजन्सी आणि तिथे काम करणारे घरपोच सिलेंडर पुरविणारे डिलिव्हरी बॉय यांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या जिवावर उदार होत, कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालन करत प्रतिकूल परिस्थितीमध्येही सिलेंडरची घरपोच सेवा दिली. या भागातील नागरिकांचा लॉकडाऊन सुसह्य करायला मदत केल्याने या भागातील नागरिकांकडून इतर जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच या घरोघरी सिलेंडर पुरविणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचेही कौतुक होत आहे. त्यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

सगळीकडे कोरोनाने धुमाकूळ घातल्याने लॉकडाऊनमुळे आपण सगळेच घरात आहोत. घरातून बाहेर पडणेही अगदी मुश्कील होऊन बसले आहे. अनेक परप्रांतीय मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी गेले. या भागात राहणारे महाराष्ट्रातील अनेक नागरिक आपापल्या गावी परतले. लॉकडाऊन होतय म्हटल्यानंतर आपल्याला सिलेंडर मिळेल की नाही या धसक्याने नागरिकांनी पंधरा दिवसातच दुसरा सिलेंडर मागवला. अशा परिस्थितीत अनेक डिलिव्हरीबॉय गावी गेल्यामुळे कामावर लोकांची संख्या कमी झाली, तर ग्राहकांकडून लॉकडाऊनच्या भीतीने सिलिंडरची मागणी वाढली हा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न सर्वच एजन्सी समोर होता. मग तिथे काम करणाऱ्या मुलांनी आपल्या मित्रांना कामावर येण्याची विनंती करत यातून मार्ग काढला.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाणेर, औंध, बालेवाडी,  पाषाण या भागातील गॅस एजन्सीने प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांना घरपोच सिलेंडर पोहोचविण्याची सेवा दिली आणि नागरिकांचा लॉकडाऊन काही अंशी सुसह्य झाला. गॅस सिलेंडर मिळाला नसता तर घरात सगळा किराणामाल किंवा इतर वस्तु असूनही स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्न समोर उभा राहिला असता,  पण या भागातील या एजन्सी आणि  डिलिव्हरी बॉईजने आपल्या जिवावर उदार होत कोरोना  प्रतिबंधाच्या सगळे उपाय आणि नियम पाळून घरपोच सिलेंडरची सेवा दिली.

ज्या  ठिकाणी सोसायटीमध्ये सिलेंडर घरापर्यंत देण्यास बंदी होती त्या ठिकाणी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळच सिलेंडर पुरविण्यात आले. त्यामुळे नागरिक घरात निश्चिंत राहू शकले. आपला जीव धोक्यात घालून इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना  युद्धांमध्ये म्हणजेच डॉक्टर, पोलिस, परिचारिका,  भाजीविक्रेते, औषध विक्रेते, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, स्वछता कर्मचारी व इतर सर्वच जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांन  बरोबरच या गॅस एजन्सी आणि घरपोच सिलेंडर पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचे कौतुक होत आहे. त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे जसजसे लॉकडाऊन वाढू लागले, तसे खरच आम्हा महिलांना, आता सिलेंडर मिळेल की नाही अशी भीती वाटू लागली होती. पण या भागातील गॅस एजन्सीने वेळ सिलेंडर पोचवून आमची चिंता दूर केली आहे. वेळेत सिलेंडर  दिल्या बद्दल धन्यवाद. 

- स्वप्नाली मोरे,  रहिवाशी बाणेर.

लॉकडाऊन सुरू होताच अनेक डिलिव्हरी बॉय हे गावी गेली. शिवाय सिलेंडरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली. पण या प्रश्नावर मात करत,  आमच्या एजन्सीकडून  घरपोच सिलेंडर ची सेवा कशी देण्यात येईल यासाठी प्रयत्न केले गेले आणि घरपोचं सेवा दिली. हे काम अविरतपणे चालू आहे.

- विश्वास कळमकर, मॅनेजर, रतन गॅस एजन्सी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com